Ad will apear here
Next
‘टायटन एको कँपेन’साठी राणा उप्पलापटी पुण्यात


पुणे : मुलांमध्ये सुरक्षिततेबद्दल, विशेषतः ‘चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श’ याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्केटर राणा उप्पलापटी हे ९०दिवसांच्या प्रवासाठी निघाले आहेत. याची सुरुवात पाच सप्टेंबरपासून करण्यात आली असून या अंतर्गत ते ९० दिवस स्केट्सवरून सहा हजार किमीचा मार्ग कापणार आहेत, तसेच २५ हजार वंचित मुलींच्या शिक्षणासाठी निधी उभारण्यात येणार आहे. 

टायटन कंपनी लिमिटेडसह टाटा ग्रुपचे व्यावसायिक सहयोगी असलेले स्केटर राणा उप्पलापटी यांनी होसूर येथून पाच सप्टेंबरला प्रवासाला सुरुवात केली. आतापर्यत तुमाकुरु, सिरा, चित्रदुर्गा, हुबळी, बेळगाव कर्नाटकात आणि कोल्हापूर या ठिकाणांचा प्रवास पूर्ण करत ते पुण्यात पोहोचले आहेत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘टायटन’चे व्यवस्थापकीय संचालक भास्कर भट म्हणाले, ‘या उत्साहवर्धक उपक्रमात टायटनने सहभागी व्हायचे ठरवले आणि नाविन्यपूर्णता, विभाजकीय आणि वैविध्यपूर्ण मार्गाने सत्य पोचवण्याचा प्रयत्न केला आहे. या वर्षी, टाटा ग्रुपची स्थापना होऊन १५० वर्षं पूर्ण होत आहेत, त्या संस्मरणार्थ आमच्या व्यवसायाला आकार देऊन सर्वश्रेष्ठ संस्था बनवणाऱ्या व्यक्तींची खास आठवण करण्यात येणार आहे.’

कॉर्पोरेट शाश्वततेचे एव्हीपी आणि प्रमुख एन. ई. श्रीधर म्हणाले, ‘टायटनने नेहमीच वंचितांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ‘एको’ या उत्तम मार्गाने आम्ही मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील आहोत. आपण ज्या समाजात विकसित झालो त्या समाजाचे संवर्धन करणे आणि सांभाळ करणे यासाठीच्या अनेक मार्गांपैकीचा हा उपक्रम आहे. राणा त्यांचा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण करतील अशा शुभेच्छा मी त्यांना देतो.’

या निमित्ताने, ‘टायटन’चे व्यावसायिक सहयोगी राणा उप्पलपटी म्हणाले, ‘टायटन कंपनीद्वारे आयोजित हा अतिशय उत्तम उपक्रम आहे. टायटन आणि मी दोघंही मुलींच्या शिक्षणासाठी अतिशय आग्रही आहोत. याशिवाय मुली आणि मुले अशा दोघांना सुरक्षिततेबद्दल आणि चांगल्या आणि वाईट स्पर्शाचे ज्ञान देणे यासाठीही आम्हाला काम करायचे आहे.’

या कँपेनअंतर्गत के. सी. महिंद्रा एज्युकेशनल ट्रस्ट मुंबई आणि आयआयएम पॅक्ट, दिल्ली या दोन्हीही संस्था एकत्रितपणे निधी गोळा करून त्यांचे वाटप करण्यासाठी भागीदार झाल्या आहेत. दोन्ही संस्था पूर्वीपासून टायटनबरोबर मुलींच्या शिक्षणासाठीच्या चालू उपक्रमात सहभागी आहेत. याशिवाय टायटन सीआयआय-यंग इंडियन्स आणि त्यांच्या लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठीचा प्रकल्प ‘मासूम’मध्ये संलग्नित आहे. सीआयआय-वायआय आणि टायटनतर्फे मुलांमध्ये ‘चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श’ याबाबत जागरुकता पसरवण्यासाठी सहा हजार जागरुकता सत्र घेतली जातील. राणाच्या प्रवासासाठीचे लॉजिस्टिक ‘यू टू कॅन रन’द्वारे देण्यात आले आहेत.

(Please click here to read this news in English.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZOJBS
Similar Posts
मुंबईत रंगला ‘डिझाइन : इम्पॅक्ट अॅवॉर्ड्स’ सोहळा पुणे : टायटन कंपनी लिमिटेड या कंपनीतर्फे नवीन उपक्रम आणि डिझाइनसाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमाच्या ‘डिझाइन अॅवॉर्ड्स फॉर सोशल चेंज’ या अंतिम फेरीचे टाटा ट्रस्टच्या साह्याने नुकतेच आयोजन करण्यात आले होते. ९९३ प्रवेशिकांमधून गुणांकनाच्या अनेक कठीण फेऱ्यांनंतर आठ विजेत्यांची निवड करण्यात आली.
टाटा मोटर्सतर्फे प्रवासी वाहनांवर खास ऑफर पुणे : टाटा ग्रुपला एकशेपन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन व्यवसाय शाखेतर्फे २५ जूनपर्यंत एक खास व मर्यादित कालावधीची ऑफर जाहीर करण्यात आली आहे. या ऑफरमध्ये एक लाख रुपयांपर्यंतचा लाभ, एक रुपयात विमा आणि स्पेशल एक्स्चेंज बोनसचा समावेश आहे. याव्यतिरिक्त यंदाच्या पावसाळ्यात आपली
‘वेस्‍टसाइड’तर्फे पुणेकरांसाठी अनोखा शॉपिंग अनुभव पुणे : ‘वेस्‍टसाइड’ या टाटा ग्रुपच्‍या भारतातील आघाडीच्‍या फॅशन रिटेलर्सने पुण्‍यामध्‍ये त्‍यांचे सातवे स्‍टोअर सुरू केले. हे स्‍टोअर जीके मॉल (तळमजला), नाशिक फाटा रोड, पिंपरी सौदागर येथे आहे. या स्‍टोअरमध्‍ये कपडे, फूटवेअर व अॅक्‍सेसरीज उपलब्‍ध आहेत.
‘टीपीसीडीटी’ने हजाराहून अधिक तरुणांना केले सबल पुणे : ग्रामीण भागातील तरुणांची कौशल्य वाढवण्यासाठी व त्यांना उद्योगांमध्ये व बाजारात रोजगार मिळण्यासाठी टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टतर्फे (टीपीसीडीटी) मावळ व भिवपुरी येथे ‘एम्प्लॉएबिलिटी– कौशल विकास प्रोग्रॅम’ सुरू केला आहे. हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून तीन वर्षांमध्ये, एक हजार १७० तरुणांना

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language